आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या समोर संकट:सोयाबीनचे नुकसान, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रु. अनुदान द्या; आमदार कैलास पाटील यांची मागणी

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोयाबीन पिकाला खोडमाशी व चक्री भुंगा किडींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन पिकाची मर झाली आहे,सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. अगोदरच्या नुकसानीनंतर पुन्हा हे संकट शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिल्याने यातुन शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पिकास प्रतिहेक्टर 50 हजार रुपयाची मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यानी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषीमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.एका बाजुला उत्पादन खर्च पन्नास हजाराच्या पुढे गेला आहे, तर मदत मात्र १३ हजार रुपयाची, त्यामूळे शेतकऱ्यांचा कसा निभाव लागणार असा प्रश्न आमदार घाडगे पाटील यानी विचारला आहे.

पाऊस चांगला झाल्याने सूरुवातीला शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता.शेतकऱ्यांचा कल नगदी पिक असलेल्या सोयाबीन पिकाकडे असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांनी वेळेत शेतीच्या मशागतीची कामे करुन खत-बियाणांची खरेदी करुन खरीप हंगामाची पेरणी पुर्ण केली.जिल्ह्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीस सततच्या पडणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील मुख्य पिक असलेल्या सोयाबीन पिकांवर मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगाय,किड अळींचा प्रादुर्भाव होवून हजारो हेक्टरवरील पिक उध्द्वस्त झाले.अशातच यलो मोझॅक या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवून सोयाबीन पिक हे पिवळे पडून हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाल्याचे आमदार पाटील यानी सांगितले.

धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद ग्रामीण महसुल मंडळातील सुर्डी, बेगडा, पिंपरी, पोहनेर, गावसुद आणि वरवंटीसह काही गावांचा जिल्हा कृषि अधिकारी व किटकशास्त्रज्ञ कृषिविज्ञान केंद्र, तुळजापूर यांच्यासोबत पाहणी दौरा केल्यानंतर सोयाबीन पिक हे हिरवे दिसत असले तरी प्रत्यक्षात खोडमाशी व चक्री भुंगा किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकाना फळधारणा नाही.हे चक्री भुंगा व खोडमाशी या किडींचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकाच्या झाडाच्या खोडामधून झाला असुन वरकरणी सोयाबीन पिक हे हिरवेगार दिसत असले तरी फळधारणा नसल्याने हजारो हेक्टरमधील सोयाबीन पिक हे संपुर्णत: वाया गेले असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

मतदार संघात नैसर्गिक आपत्ती व सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईबाबत भरीव आर्थिक मदत देण्याकरीता झालेल्या नुकसान भरपाईचा सहानुभुतीपुर्वक विचार होवून प्रतिहेक्टरी ५० हजार एवढी मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार घाडगे पाटील यानी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...