आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा स्पर्धेचे आयोजन:राज्यस्तरीय लाठी स्पर्धेमध्ये 22  जिल्ह्यातील 500 स्पर्धकांचा सहभाग

तुळजापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत राज्यातील २२ जिल्ह्यातील जवळपास ५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा लाठी असोसिएशन व जिल्हा शिवसेना, महिला आघाडीच्या वतीने तिसऱ्या राज्यस्तरीय लाठी अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

येथील श्रीनाथ लॉन्स मंगल कार्यालय येथे या स्पर्धेचा शनिवारी (दि. १९) सकाळी प्रारंभ झाला. यावेळी लाठी इंडियाचे डायरेक्टर महंमद रफी, महागुरू सुभाष मोहिते, महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. युसूफ मुल्ला, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष अनिल सगर, सचिव सुराज मोहिते, शिवराम भोसले, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे, शाम पवार आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...