आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:सामुदायिक वंदे मातरम््साठी 5 हजार विद्यार्थी सहभागी ; भव्य तालुकास्तरीय सामुदायिक उपक्रम

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिन्दुस्तान स्काउट्स अँड गाईड्स तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शहरात श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे मैदानावर भव्य तालुकास्तरीय सामुदायिक वंदेमातरम् हा उपक्रम शनिवारी (०१) झाला.सामुदायिक वंदे मातरम् यासाठी तालुक्यात ९० शाळेतील पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यासाठी माजी आमदार तथा राज्य मुख्य आयुक्त हिंदुस्थान स्काउट् अँड गाईड्स नरसिंग मेंगाजी, राज्य पाध्यक्ष तथा आमदार ज्ञानराज चौगुले, मुख्य कार्यकारी सचिव गोपाळराव डोंगरे, तहसीलदार शिवाजी कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधवर, राज्य सचिव तुकाराम डोणगावे, स्काउट व गाईड विभागीय अधिकारी मुनीर पट्टनकुडे, उप अधिकारी अमोल मिराशे, जिल्हा सचिव राजकुमार चक्रे उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रित वंदे मातरम् या राष्ट्रीय गानाचे गायन केले.शाळा, विद्यालय, शासकीय, निमशासकीय व सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेवून सांगता वन्दे मातरम् या राष्ट्रीय गीताने झाला पाहिजे. या माध्यमातून साध्य झाला.

बातम्या आणखी आहेत...