आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भांडाफोड:कर्नाटक राज्यात 50 हजारात गर्भलिंग निदानाचे पातक, एजंट अटकेत‎; तीन महिलांच्या‎ आधारे स्टिंग पूर्ण‎

धाराशिव‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील गरोदर महिलांना कर्नाटक ‎ राज्यातील कलबुर्गी (गुलबर्गा) येथे नेऊन‎ ५० हजार रुपयांत अवैध गर्भपात व गर्भलिंग ‎ ‎निदान चाचणी करण्यात येत होती. गेल्या‎ अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर राहून ‎ ‎ जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिस‎ विभागाच्या समन्वयाने गरोदर महिला पोलिस ‎ ‎ कर्मचाऱ्याचा यात समावेश करुन या‎ प्रकरणाचा भांडाफोड केला.

यातील‎ एजंटचा भ्रमणध्वनी ताब्यात घेऊन बुधवारी‎ उमरगा न्यायालयात एजंट, डॉक्टर आणि‎ अन्य साथीदारावर फिर्याद दाखल केली.‎ महाराष्ट्रातून परराज्यात म्हणजेच कलबुर्गी‎ ‎ (गुलबर्गा) येथे विविध‎ ‎ जिल्ह्यांतून तसेच‎ ‎ खेड्यापाड्यातून काही‎ ‎ एजंट मार्फत गर्भवती‎ ‎ महिलांना अवैद्यरित्या‎ ‎ गर्भलिंग निदानासाठी‎ ‎ घेऊन जात असल्याची‎ ‎ माहिती पोलिसांना‎ ‎ मिळाली होती.

पोलिस व‎ आरोग्य विभागाचे सिव्हिल सर्जन डॉ.‎ राजाभाऊ गलांडे यांच्या आदेशाने व‎ मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अधीक्षक डॉ.‎ विनोद जाधव, विधी सल्लागार ॲड. रेणुका‎ शेटे, तसेच पोलिस दलाचे पथक यांच्या‎ मार्फत उमरगा चौरस्ता येथे पाच एप्रिल रोजी‎ चाचणी करण्यासाठी गरोदर महिलांना घेऊन‎ जात असताना एजंट खुद्दास जानेमिया‎ कादरी, साहेब गल्ली निलंगा, जि. लातूर यास‎ रंगेहाथ पकडले होते. त्याच्या ताब्यातून‎ पोलिसांनी पैसे आणि मोबाईल ही जप्त केले. ‎ ‎

त्याच बरोबर या घटनेचा पंचनामा करुन‎ संबंधीत तीन महिलांचे जबाब घेऊन कारवाई ‎ ‎ मधील डॉक्टर, एजंट इतर साथीदारावर‎ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी उमरगा या‎ न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली‎ आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये निरीक्षक‎ यशवंत जाधव, मनोज निलंगेकर,‎ वलीऊल्ला काझी, विनोद जानराव व प्रकाश ‎ ‎ औताडे, पांडुरंग सावंत, साईनाथ आशमोड,‎ व इतरांनी कामगिरी केली हा प्रकार उघड करण्यासाठी निलंगा,‎ उमरगा आणि अन्य एका ठिकाणच्या‎ गरोदर महिलांचे सहकार्य घेऊन हे‎ स्टिंग पूर्ण केले. यासाठी पोलिस‎ खात्याच्या गरोदर महिला‎ कर्मचाऱ्याचा समावेश करण्यात‎ आल्याने ही कारवाई यशस्वी रित्या‎ पूर्ण करता आली. यासाठी‎ पोलिसांनीच ५० हजार रुपये संबंधित‎ बनावट महिला ग्राहकाला दिले होते.‎ हे पैसे संबंधित एजंटने स्वत:च्या‎ ताब्यात घेतले होते.‎

न्यायालयाच्या आदेशाने पुढील‎ कारवाई

गेल्या अनेक‎ ‎ दिवसांपासून हा प्रकार‎ ‎ सुरु होता. याची माहिती‎ ‎ मिळाल्यावर बनावट‎ ‎ ग्राहक तयार करुन‎ ‎ संबंधीत एजंट पर्यंत‎ पाेहचलो. पोलिसांनी त्याच्याकडील पैसे,‎ मोबाईल ताब्यात घेतला. न्यायालयात‎ फिर्याद दाखल केली आहे. एका‎ ग्राहकांकडून एजंट व डॉक्टर ५० हजार‎ रुपये घेत असल्याची माहिती आहे.‎

-डॉ. राजाभाऊ गलांडे, शल्य चिकित्सक.‎

लिंग गुणोत्तर‎ ८७१ वरून ९१२‎

जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,‎ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी‎ अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा‎ शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ‎ गलांडे, नोडल ऑफिसर डॉ. दत्तात्रय‎ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली‎ पीसीपीएनडीटी कमिटी सतत कार्यरत‎ आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांचे‎ लिंग गुणोत्तराचे प्रमाण ८७१ वरून‎ ९१२ पर्यंत पोहोचले आहे. यात‎ आणखी वाढ करण्यासाठी ही प्रयत्न‎ करत आहे.‎

माहिती देणाऱ्यास एक‎ लाख रुपयांचे बक्षीस‎

अवैधरित्या गर्भलिंग निदान‎ करणाऱ्या डॉक्टरांची माहिती‎ देणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस‎ देण्यात येईल. महिती देणाऱ्या‎ व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात‎ येईल. ही माहिती नजीकच्या‎ ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा‎ रुग्णालयात संपर्क साधावा अथवा‎ १८००२३३४४७५ या हेल्पलाईन‎ नंबरवर संपर्क साधून माहिती द्यावी.‎ अस आवाहन जिल्हाधिकारी डॉ.‎ सचिन ओम्बासे यांनी केले.‎