आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:कोरोनाचे ५२ नवे रुग्ण तर ५१ जण झाले कोरोनामुक्त

उस्मानाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात गुरुवारी ५२ कोरोना रुग्ण आढळले. तर ५१ जण कोरोनामुक्त झाले. बाधितात एक ६ वर्षीय मुलगी आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. दुसरीकडे बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांची ही संख्या अधिक आहेत. त्यामुळे सद्या जिल्ह्यात उपचाराखाली २३७ रुग्ण असल्याचे समोर आले आहेत. जून महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत असल्याचे समोर आले आहेत. आता ही रुग्ण संख्या अधिक असल्याचे समोर आले. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक १७ रुग्ण उमरगा तालुक्यात आढळून आले आहेत. त्याच बरोबर १३ रुग्ण उस्मानाबाद तालुक्यात असल्याचे समोर आले. तसेच भूम मध्ये ११, परंडा पाच, लोहारा तीन, तुळजापूर दोन, कळंब मध्ये एक रुग्ण आढळून आला. वाशी मध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. आता पर्यंत जिल्ह्यात एकूण ७५ हजार १५४ रुग्ण बाधित झाले असून त्यापैकी ७२ हजार ७९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासन व आरोग्य खात्याने नागरिकांना सोशल डिस्टंन्सिग आणि मास्क वापरण्याचा सल्ला दिलेला आहे. मात्र याकडे अनेक जण दुर्लक्ष्य करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...