आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणूक:54 जागा अनुसूचित जातीसाठी, 229 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी; उमरगा तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीत 284 सदस्यांपैकी 159 जागा महिलांना

उमरगा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात २८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संभाव्य पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने आरक्षण निश्चित करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता. एकूण २८४ जागांपैकी २२९ जागा सर्वसाधारण गटासाठी राहिल्या आहेत. तुगांव येथील आरक्षण चुकीचे झाल्याबद्दल महेश मुगळे यांनी आक्षेप घेतला आहे. त्रिकोळी येथील प्रभाग आरक्षणावर प्रदीप भोसले यांनी आक्षेप घेतले. येणेगूर येथे राहुल बनसोडे यांनी आरक्षणावर आक्षेप घेतला आहे.

तालुक्यात ग्रामपंचायतीच्या जानेवारी २०२१ ते डिसेंबर २२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा दुसऱ्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ३१ जानेवारीपासून फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी प्रभाग रचना अंतिम झाली होती. त्यानंतर आरक्षण कार्यक्रम जाहीर झाला होता. तालुक्यात आलूर, आनंदनगर, बेळंब, कोथळी, कंटेकुर, केसरजवळगा, वरनाळवाडी, भुसणी, चिंचोली (भुयार), औराद, नारंगवाडी, धाकटीवाडी, माडज, येणेगूर, सुंदरवाडी, महालिंगरायवाडी, कोराळ, एकुरगा, चिंचोली (जहागीर), त्रिकोळी, मळगी, मळगीवाडी, तुगांव, कलदेवनिंबाळा, अंबरनगर, कोरेगाव, कोरेगाववाडी, कसगी या गावातील प्रभागांचे आरक्षण निश्चित झाले आहे.

दावे, हरकतींवर १६ जूनला अभिप्राय
तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध केल्यानंतर हरकती, सूचना दाखल करायच्या सोमवार (दि.१३ जून) अखेरचा दिवस होता. १६ जून रोजी उपविभागीय अधिकारी यावर अभिप्राय देतील. २० जूनला उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय विचारात घेत जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचनेस (नमुना अ) मान्यता देतील. २१ जूनला अंतिम अधिसूचनेस व्यापक प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील १३० महिलांना संधी
तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींमधील एकूण २८४ जागांपैकी अनुसूचित जातीच्या ५४ जणांचे आरक्षण निश्चित झाले आहे. त्यात २८ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. २६ जागांवर पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे. अनुसूचित जमाती महिलेसाठी औराद येथील एक जागा निश्चित करण्यात आली आहे. २२९ सर्वसाधारण जागांपैकी १३० जागांवर महिलांचे आरक्षण काढण्यात आले तर ९९ जागा पुरुषांसाठी आहेत. आरक्षण सोडतीनंतर ९ जूनला प्रभागनिहाय आरक्षणाची प्रारुप रचना प्रसिद्ध करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...