आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद शाळांमधील पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची श्रीहरिकोटा, बेंगळुरू केरळ या ठिकाणी हवाई सहल निघणार आहे. यासाठी पात्र होण्यासाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा सोमवारी पार पडली. यासाठी जिल्ह्यातील ६ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी बसले होते. रात्री उशिरापर्यंत केंद्रनिहाय दिलेल्या विद्यार्थ्यांचे आकडे संकलित करण्याचे काम सुरू होते. एकूण ६२७६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले व १०४ गैरहजर राहिले.
यासाठी तीन टप्प्यामध्ये परीक्षा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, संशोधन वृत्तीचा विकास व्हावा, विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांच्या कार्य पद्धतीची ओळख व्हावी, राष्ट्रीय पातळीवरील संशोधन प्रकियेची माहिती मिळावी, या हेतूने इस्रोच्या अंतराळ संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी जिल्ह्यातून २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्याची परीक्षा ८० केंद्रांच्या स्तरावर सोमवारी पार पडली.
यामध्ये ७ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. ईट व निपाणी केंद्रामधून १८४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या परीक्षेचा दुसरा टप्पा दि. १३ मार्च रोजी तालुका स्तरावर होणार आहे. तिसरा व शेवटचा टप्पा दि. २० मार्च रोजी जिल्हास्तरावर होणार आहे. यातून गुणवंत विद्यार्थी या हवाई सफरीसाठी पात्र होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.