आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील ढोकी ग्रामपंचायतसाठी आज ६७ टक्के मतदान झाले असून सरपंच पदासह ७२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मंगळवार दिनांक २० रोजी मतमोजणी होणार आहे. सहा प्रभागात मिळून १७ जागांसाठी ६८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते तर सरपंच पदासाठी चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सहा प्रभागात मिळून १६ बुथ होते.
ग्रामपंचायत साठी विद्यमान सत्ताधारी समुद्रे गटाचा कै. किसन तात्या समुद्रे बहुजन ग्राम विकास आघाडी, माजी सरपंच गुणवंत देशमुख व गफार काझी यांचा ढोकी ग्राम विकास आघाडी, भाजप प्रणित राणा जगजीत सिंह पाटील बहुजन ग्राम विकास आघाडी व मंत्री तानाजी सावंत प्रणित ग्राम विकास आघाडी असा चौरंगी मुकाबला झाला असून काही प्रभागात आम आदमी पक्ष, मनसे यांनी उमेदवार उभे करून लढतीत रंग भरला होता.ढोकी ग्रामपंचायतसाठी ११४५३ मतदारांपैकी ७७३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वाहनाने बाहेरून मतदार आणणयाची कसरत सर्वच पॅनेलने केल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली आहे.
मतदान यंत्रावरून मतदारात संभ्रम
मतदानासाठी सरपंच पदासाठी स्वतंत्र मतदान यंत्रांची आवश्यकता असताना निवडणूक विभागाने सरपंच व सदस्य पदासाठी दोन मतदान यंत्रे उपलब्ध केली होती. त्यापैकी एका यंत्रावर सरपंच व एका प्रवर्गातील सदस्य पदाच्या उमेदवाराचा समावेश होता तर दुसऱ्या यंत्रावर उर्वरित दोन प्रवर्गातील सदस्य पदाच्या उमेदवाराचा समावेश करण्यात आला होता. तसेच चिन्ह अस्पष्ट असल्याने मतदारात संभ्रम झाल्याच्या अनेक मतदाराकडून तक्रारी मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर करण्यात आल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.