आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहभाग:समर कॅम्पमध्ये 70 विद्यार्थ्यांचा सहभाग ; य़ात विविध खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लोटस पोद्दार लर्न स्कूल येथे पंधरा दिवसांपासून चालू असलेल्या स्पोर्ट््स समर कॅम्पचा समारोप व बक्षिस वितरण समारंभ सोमवारी दि.३० रोजी पार पडला. शहरातील लोटस पोद्दार लर्न स्कूल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लोटस पोद्दार लर्न स्कूल व ओमसाई स्पोर्ट््स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट जुडो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली पंधरा दिवस स्पोर्ट््स समर कॅम्पमध्ये विविध खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील जवळपास सत्तर विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. पंधरा दिवस चाललेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या विविध खेळात प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोटस पोदार स्कूलचे सचिव विशाल कोकर, प्रदिप भोसले , ॲड. शिल्पा सुरवसे, कल्पना शिवदे, स्नेहा आबाचने यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. पंधरा दिवस चाललेल्या या स्पोर्ट्स समर कॅम्पमध्ये आर्चरी, जुडो, सेल्फ डिफेन्स, स्केटिंग, सिलंबम, कराटे,एरोबिक्स, जिम्नॅस्टिक्स, काठी आदी प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले. विशाल पवार (जुदो प्रशिक्षक) प्रतीक्षा राठोड, ओम राठोड, प्राची भोसले प्रणव भोसले सत्यगणेश गालीपील्ली आदींचा सत्कार करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये उत्कृष्ट खेळाडू कु. आनंदी शिवदे, अथर्व चाकूरकर, सोहम क्षीरसागर, योगींधरा सुरवसे, प्राची भोसले, श्रावण दामले पाटील यांनी प्रावीण्य प्राप्त केले. या कॅम्पमध्ये विशाल पवार, ओम राठोड, रोहिणी बनसोडे,आनंद गवळी, अश्विनी इंगळे, लक्ष्मण काळे, साई राठोड, लक्ष्मण एकुरगे, प्रतीक्षा राठोड आदी प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले. या स्पोर्टस समर कॅम्पच्या आयोजनासाठी ओमसाई स्पोर्ट्सचे मास्टर प्रताप राठोड यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...