आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवित्र श्रावण महिना:700 महिलांना शिंगणापूर, पंढरपूरचे दर्शन

नळदुर्ग10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यांनी नळदुर्ग शहरातील महिलांसाठी ४ ऑगस्ट रोजी पंढरपूर व शिखर शिंगणापूर मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन केले होते. पहिल्या टप्प्यात ७०० महिलांनी देवदर्शन यात्रा केली. महिलांचा सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी अशोक जगदाळे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या १४ बस बुक केल्या होत्या. या १४ बासमधुन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी व शिखर शिंगणापूर येथील श्री महादेवाचे दर्शन महिलांना पवित्र श्रावण महिन्यात घडवून आणण्याचे पुण्यकर्म अशोक जगदाळे यांनी केले. शिखर शिंगणापूर येथील देवदर्शनानंतर मंदिराच्या खालच्या बाजुस एक मंगल कार्यालय बुक केले होते. याठिकाणी महिलांना विश्रांती तसेच भोजनाचीही व्यवस्था केली होती.

यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी माजी नगरसेवक नितीन कासार, कमलाकर चव्हाण, संजय मोरे, शरद बागल, रमेश जाधव, अमृत पुदाले, सरदार सिंग ठाकूर, नवल जाधव, दीपक काशीद, राजेंद्र महाबोले, प्रवीण चव्हाण अमित शेंडगे, उमेश जाधव, सुजित बिराजदार, नेताजी महाबोले, अजय दासकर सोमनाथ म्हात्रे, अंकित मगतराव, तीर्थयात्रा समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...