आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ५२४४८ मतदारांनी (७९.७१ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी मंगळवारी (दि.२०) तांदुळवाडी रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. ३० सरपंचपदासाठी ८८ उमेदवार रिंगणात होते. तर सदस्यपदासाठी ६५६ उमेदवार रिंगणात होते. रविवारी १२७ केंद्रांवर मतदान झाले. कार्यकर्त्यांनी शाब्दिक चकमक वगळता अनुचित घटना घडली नाही. ३४९२१ मतदारांपैकी २८१७९ मतदारांनी मतदान केले. तर ३०८७६ महिलांपैकी २४२६९ महिलांनी मतदान केले. एकूण ५२४४८ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
मंगळवारी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. साधारण दोन तासात मतमोजणी संपणार, असा अंदाज आहे. मत मोजणीसाठी १६ टेबल ठेवण्यात आले आहे. एकाच वेळी १६ गावातील मतमोजणी होणार आहे. एकूण तीन राऊंड मध्ये ३० ग्रामपंचायतींची मतमोजणी केली जाणार आहे. एका टेबलसाठी पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी परिवेक्षक, तलाठी व शिपाई असे असतील. त्यांच्यावर उपविभागीय अधिकारी, निवडणूक निरीक्षक,तहसीलदार, यांचे नियंत्रण असेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.