आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात अद्वितीय योगदान:75 स्वातंत्र्यसैनिक करणार आंदोलन ; लेखी परवाना काढून सरकारला इशारा

उमरगा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, पाल्य व नामनिर्देशित पाल्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील ७५ स्वातंत्र्यसैनिक हे ७५ झेंडे घेऊन मुंबई येथील आझाद मैदानावर १२ सप्टेंबरला आंदोलन करणार आहे. आंदोलन करण्याचा लेखी परवाना काढून सरकारला इशारा देण्यात आला.

स्वातंत्र्यसैनिकांनी कुटुंबीय, घरादाराची पर्वा न करता हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात अद्वितीय योगदान दिले आहे. त्यामुळेच राज्य व केंद्र सरकाराने सन्मानपत्र देऊन मानधन स्वरुपात पेन्शन चालु केली. स्वातंत्र्य सैनिकांच्या नामनिर्देशित पाल्यांंना शासकीय सेवेत प्राधान्यक्रम देवून राज्यस्तरावर नोकरी देण्याचा शासन निर्णय ४ मार्च १९९१ रोजी जाहीर करून सोबत काही सुविधाही जाहीर केल्या. मात्र मंत्रालयातील शासकीय कर्मचाऱ्यांनी सोयीनुसार शासकीय निर्णयाला बगल देत अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले. याप्रसंगी कोर्टाने निर्णय देवून आदेश दिल्यानंतरही आदेशाची अंमलबजावणी टाळाटाळ चालु आहे.

यासंबंधी वारंवार लेखी निवेदन सामान्य प्रशासन मंत्रालयात देऊनही स्वातंत्र्यसैनिक, पाल्य व नामनिर्देशित पाल्यांना टाळण्याचे काम आजपर्यंत चालुच आहे. मागील चार वर्षांपासून सामान्य प्रशासन मंत्रालयात धूळ खात ठेवलेली फाइल प्रधान सचिवापर्यंत पाठवण्याचे कार्य चालु आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या नामनिर्देशित पाल्यांच्या नियुक्ती संबंधीत शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करा, शासकीय सेवेतील नामनिर्देशित पाल्यांना त्यांच्या सेवा काळानुसार बढती देणे, स्वातंत्र्यसैनिक जिवंत असताना नोकरीसाठी करून दिलेले नामनिर्देशनपत्र मृत्यू पश्चात रद्द करणे, नामनिर्देशित पाल्य शासकीय सेवेत रूजू होईपर्यंत नामनिर्देशन पत्र रद्द न करणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या मानधनात वाढ करून सन्मान करणे, २८ फेब्रुवारी २०१४ शासन निर्णय रद्द करून शासकीय स्तरावर अंमलबजावणी करणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना राष्ट्रीय कुटुंब म्हणून जाहीर करणे व ओळखपत्र सन्मानाने देणे आदींसाठी आंदोलन करण्यात येत आहे, असे प्रसाद पाटील, स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाल्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...