आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव झाला. लम्पीने जिल्ह्यातील ७ हजार ५९५ जनावरे बाधीत झाली. तर ४१९ जनावरे दगावली आहेत.लसीकरण आणि प्रतिबंधक उपाययोजना करून शेतकऱ्यांचे पशुधन वाचवावे कारण जनावरांचे बाजार बंद असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी (ता. माळशिरस) येथे ३ सप्टेंबर लम्पीने पहिले जनावर बाधीत आढळले. दोन महिन्यात ७५९५ जनावरे बाधित झाली. त्यापैकी ४१९ जनावरांचा मृत्यू झाला.लम्पीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. जिल्हा परिषदेकडे २०३ उपचार संस्था व ११ विस्तारअधिकारी आहेत. उपचाराची दिशा निश्चित न झाल्यानेच साथ पसरल्याचे पशुपालक बोलत आहेत.
जिल्ह्यात बाधीत व मृत्यूची संख्या माळशिरस तालुक्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर करमाळा, पंढरपूर, सांगोला तालुक्यात प्रादुर्भाव मोठा आहे. जनावरे दगावल्याने पशुपालक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. संकरीत गायीची किंमत जवळपास एक लाख आहे. मदत मात्र ३० हजार रुपयेच मिळते. एका बैलास २५ हजार तर वासरास १६ हजार नुकसान भरपाई मिळते. ही मदत तुटपुंजी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.