आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:शेकापचा ७५ वा वर्धापन दिन साजरा

तुळजापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी कामगार पक्षाचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.शहरातील कमानवेस भागातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश देशमुख, खलील शेख, प्रकाश धट, विलास वेदपाठक आदींनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी आगामी नगरपालिका निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. तसेच ही निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी शेकापचे जिल्हा संघटक उत्तम अमृतराव, तालुका चिटणीस किरण खपले, सुधीर जमादार, श्रेयस कुतवळ, अॅड. सुनील शिंदे, आदित्य कदम, गणेश अमृतराव, अॅड. सुनील झोंबाडे, शिवनाथ भांजी, नवनाथ जगताप, उमेश भिसे, प्रा. विलास जगदाळे, किरण माने, बाळासाहेब कुतवळ, रामभाऊ बनपट्टे, यल्लापा बनपट्टे, सुभाष छत्रे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...