आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांची धावपळ:उमरगा पालिकेकडून 76 % वसुली, घनकचरा व अग्निशमन कराचा नवीन बोजा

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मालमत्ता, पाणी, शैक्षणिक, रोजगार हमी योजनेच्या कराचा वार्षिक भरणा आणि व्याजाचा भुर्दंड टाळण्यासाठी ३१ डिसेंबर अखेरपर्यंत पालिकेकडे कराचा भरणा करण्यास नागरिकांची धावपळ सुरू आहे. शासनाने घनकचरा शुल्क, अग्निशमन कराचा नवीन बोजा शहरातील नागरिकावर लादला जात आहे.उमरगा शहरातील मालमत्ताधारकांची १६ डिसेंबरपर्यंत कराची ७६ टक्के वसुली झालेली आहे. मालमत्ताधारकांपर्यंत विविध कराचे बील भरण्याचे मागणी पत्र देण्यात येते.

बहुतांश मालमत्ताधारकांपर्यंत बिले पोहच न झाल्याने बिलाबाबत अनभिज्ञ असलेल्या दंडासह मालमत्ताधारकांना भुर्दंड सहन करावा लागतो. त्यासाठी नागरिकांनीच जागरूक होण्याची वेळ आली आहे.

दरम्यान हद्दवाढ भागातील व शहरातील कित्येक व्यावसायिक, तसेच घरांच्या नोंदी नसल्याने नगर पालिकेचा लाखो रुपयाचा कर बुडत होता. गेले दोन वर्षात बहुतांश नोंदी झाल्याने उत्पन्न वाढत आहे. अजुनही बऱ्याच मालमत्तेच्या नोंदी नाहीत. गेल्या पाच वर्षापासून डिसेंबर अखेर कर वसुली पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यानंतर मालमत्ताधारकांना दोन टक्के दंडासह कर भरावा लागतो. त्यामुळे ३१ डिसेंबरपूर्वी बील भरण्याची धावपळ सुरू आहे. शहरातील मालमत्ता कराच्या ६९ लाख ६६ हजार मागणी पैकी १६ डिसेंबरपर्यंत ५२ लाख ९५ हजार (७६.०४टक्के), पाणीपट्टीची ७७ लाख ८ हजार (७३.५९ टक्के), शिक्षण कराच्या २२ लाख ७६ हजारांपैकी ११ लाख ८४ हजार (५२ टक्के), रोहयो कराच्या तीन लाख ८४ मागणी पैकी ३ लाख २ हजार (७८.६५ टक्के) वसूल झाले आहेत.

घनकचरा कराचा नवीन कर भरणा, वेळेत भरणा करण्याचे आवाहन शासनाने एप्रिल २०२२ पासून घनकचरा शुल्क सुरू केला आहे. त्याची मागणी ११ लाख ३८ हजार होती. त्यापैकी नोव्हेंबर अखेर ६ लाख ५८ हजार वसूल झाले आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत मागे असलेल्या पालिकेकडून आता घनकचरा शुल्क वसुलीचा बोजा अन्यायकारक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.

नगर पालिका घनकचरा व्यवस्थापनेवर वर्षाला १८ लाख रुपयांच्या खर्चाचा बेहिशोब सुरू असताना आता नवीन कर लादण्याचा प्रकार चुकीचा वाटतो. दरम्यान अग्निशमन कराच्या १ लाख १२ हजार मागणी पैकी १ लाख वसुल झाले आहेत. याबाबत बोलताना मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर म्हणाले, हद्दवाढ भागातील व शहरातील नवीन मालमत्तेच्या नोंदी झालेल्या आहेत. एकही नोंद शिल्लक ठेवायची नाही, अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विविध कराचा भरणा वेळेत करणे गरजेचे आहे. नागरिकांनी ३१ डिसेंबरपर्यंत थकबाकी अन् चालू बाकी भरून पालिकेला सहकार्य करावे.

बातम्या आणखी आहेत...