आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील वडगाव येथे शालेय तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पोलिस उपाधीक्षक कल्याण घेटे यांच्या हस्ते झाले. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, अंकुश मोरे, सरपंच बळीराम कांबळे, उपसरपंच जयराम मोरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांत हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेत तालुक्यातून मुलांचे ५५ व मुलींचे २६ संघ सहभागी झाले. त्यात १४ वर्षे, १७ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या गटात वडगाव जिल्हा परिषद शाळेत स्पर्धा घेण्यात आली. १४ वर्षे वयोगटातून कसबे तडवळा येथील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर मुलींमध्ये सारोळा शारदा निकेतन विद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. १७ वर्षे वयोगटातून शिवपार्वती विद्यालय वाघोली यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
तर मुलींमध्ये बेंबळी येथील जिजामाता हायस्कूलने विजेतेपद पटकावले. १० वर्षे वयोगटातून जवाहर कनिष्ठ महाविद्यालय बावी यांनी प्रथम क्रमांक तर मुलींमध्ये आर. पी. कॉलेज यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी तालुका संयोजक बिभीषण पाटील, आयोजक गजेंद्र जाधव, पंचायत समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाह व उस्मानाबाद जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव महादेव साठे यांनी सर्व पंचांना बोलून स्पर्धा सुरळीत पार पाडली. पंच प्रमुख मोहन पाटील, अमर राऊत, बाबा जगताप, शाम जाधवर, पोपट पुरी, नितीन हुंबे, सतीश कोळगे, प्रथमेश पाटील, प्रकाश पवार, रवी चव्हाण, रोहित घोडके, स्वाती सिरसठ, जावळे, विनोद राठोड आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.