आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नगाठ:सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 8 जोडप्यांची लग्नगाठ ; नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले

भूमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात आठ वधू-वर विवाहबद्ध झाले. तालुक्यातील नळी वडगाव येथील वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या वतीने तालुक्यात सामुदायिक विवाह सोहळ्याची खंडित झालेली परंपरा पुन्हा येथील रवींद्र हायस्कूल येथे सामुदायिक विवाह सोहळा घेऊन सुरू करण्यात आली. प्रवीण रणबागूल यांनी स्वखर्चातून हा सोहळा घेतल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. या विवाह सोहळ्यात विविध धर्मातील एकूण ८ वधू-वर विवाहबद्ध झाले. नवदांपत्यांना संसारोपयोगी साहित्यासह मणी मंगळसुत्र देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, मल्हार आर्मीचे प्रमुख सुरेश कांबळे, माजी जिप अध्यक्ष बाळासाहेब पाटील, डीसीसी बँकेचे संचालक संजीव पाटील, माजी सभापती बालाजी गुंजाळ, चिंचपूर गटनेते विशाल ढगे, माणकेश्वरचे उपसरपंच विशाल अंधारे, सरपंच परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा जिनत सय्यद, प्रा. कोहिनूर सय्यद, नळी वडगावच्या सरपंच प्रियंका रणबागूल व मान्यवरांनी उपस्थित राहून नव-वधूवरांना शुभाशिर्वाद दिले.

सामाजिक बांधिलकी म्हणून आयोजन ^सामाजिक बांधिलकी म्हणून मी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला. यातून अनेकांचे संसार सुरू होण्यास हातभार लागल्याचा आनंद आहे. - प्रवीण रणबागुल, मराठवाडा उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी.

गोरगरिबांना उपयुक्त ^हा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा गोरगरिबांना अतिशय उपयुक्त ठरला आहे. अशा उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करावे. - विशाल ढगे, गटनेते ग्रामपंचायत कार्यालय, चिंचपूर ढगे.

बातम्या आणखी आहेत...