आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रुग्णसंख्या:जिल्ह्यात कोराेनाचे नवीन 8 रुग्ण, 34 जणांवर उपचार

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची रुग्णसंख्या घटत चालली आहे. तरीही रविवारी दिवसभरात जिल्ह्यात नवीन आठ कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तसेच नऊ जण या आजारातून ठणठणीत बरे होऊन आज घरी गेले आहेत. त्यामुळे केवळ ३४ जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत.जिल्ह्यात मुबलक लस असूनही लाखो लाभार्थींनी याकडे दुर्लक्ष केले आहेत. अशा परिस्थितीत कोराेनाची चौथी लाट जून महिन्यात येऊन धडकली. यात प्रारंभी आणि आता शेवटच्या टप्यात कमी रुग्ण आढळून येत असले तरी, मध्यंतरी रुग्णांचा आकडा ५५ पार गेला होता. त्यामुळे ३०० पर्यंत रुग्ण उपचाराखाली होते. आता रुग्णांचा आकडा कमी असल्याने उपचाराखालील कमी रुग्ण असल्याचे दिसून आले. त्याच बरोबर आता पर्यंत जिल्ह्यात ७५ हजार ५७६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७३ हजार ४२३ रुग्ण यातून बरे होऊन घरी गेले आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक उमरगा तालुक्यातील तीन रुग्ण आढळले. तसेच लोहारा मध्ये दोन तर उस्मानाबाद, तुळजापूर आणि भूम तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. कळंब, वाशी, परंडा तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

बातम्या आणखी आहेत...