आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:परंडा येथे 8 नोव्हें. रोजी  मराठा आरक्षण महामोर्चा ; व्यापारी महासंघ सामील होणार

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी येथील तहसील कार्यालयावर मराठा आरक्षण महामोर्चा काढण्यात येणार असून प्रत्येक गावात बैठका घेऊन मोर्चाची जय्यत तयारी सुरु असुन येथील व्यापारी महासंघाच्या वतीने बैठक घेवून दुकाने बंद ठेवून महामोर्चास सहभाग व सहकार्य करण्याचा निर्णय निवेदन देऊन घेण्यात आला. मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील ९६ गावात बैठका घेऊन कुटुंबासह महामोर्चात सहभागी होण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.परंडा तालुक्यासह परिसरात महामोर्चाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. महिलांनी देखील स्वतंत्र बैठका घेऊन महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.महामोर्चा नंतर रुई मार्गावरील कोटला मैदानावर सभा घेण्याचे नियोजन असून लाखो लोक सहभागी होतील असा अंदाज आहे.

मराठा आरक्षण महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर परंडा शहरातील विविध व्यापारी संघटनेने शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली.यावेळी व्यापारी महासंघ, किराणा असोसिएशन सराफ व सुवर्णकार असोसिएशन, तालुका फर्टीलायझर, पेस्टीसाईडस अँड सीडस् डिलर असोसिएशन, स्टेशनरी, अँड जनरल स्टोअर्स व्यापारी असोसिएशन, कपडा अँड रेडिमेड व्यापारी असोसिएशन, महाराष्ट्र नाभिक महामंडळ आदीनी सकल मराठा महामोर्चा दिवशी मंगळवारी (दि.८) सर्व बाजारपेठ, दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.याबाबतचे निवेदनही यावेळी देण्यात आले यावेळी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, व्यापारी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...