आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट स्कूल:जिल्हा परिषदेच्या 80 शाळा बनणार स्मार्ट स्कूल

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ८० जिल्हा परिषद शाळांना जागतिक स्तराच्या निकषांनुसार सुविधा उपलब्ध करून स्मार्ट स्कुल बनवण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शाळेत एक कोटी रुपये निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी विविध योजनांचा निधी वापरण्यात येणार असून तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडेही निधीची मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १०३८ शाळा आहेत. यापैकी ८० प्राथमिक शाळांना स्मार्ट स्कुल बनवण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रातील एक याप्रमाणे या शाळांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी शिक्षणाधिकारी रामलिंग काळे, गजानन सुसर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातील १० शाळांमध्ये काही दिवसातच सुविधा निर्माण करून स्मार्ट स्कुल म्हणून दर्जा देण्यात येणार आहे.

यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही शिक्षणाधिकारी, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा, समग्र शिक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदींची समितीही तयार केली आहे. अतिरिक्त वर्गखोल्यांची बांधकामे, वर्गखोल्यांची दुरूस्ती, वगैरे व्यवस्था करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...