आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथे सलग तीसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या हाफ मॅरेथॉनमध्ये धावलेल्या तीन हजार स्पर्धकांपैकी ८४ उत्कृष्ट स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. यामध्ये जिल्हा व जिल्हा बाहेरील गट तसेच विविध वयोगटासाठीही पारितोषिके देण्यात आली. मॅरेथानमध्ये विविध २८ गटांमध्ये पारितोषिके देण्यात आली.
यामध्ये ८४ स्पर्धकांना गौरवण्यात आले. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांचा गोरवण्यात आले. यामध्ये प्रत्येक गटातील पहिल्या तीन स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. यामध्ये ५ किलोमीटर खुल्या पुरूष व महिला गटातून अनुक्रमे ओंकार भोसले, संतोष राजेभोसले, कपिल रामेगावे महिलातून राजनंदीनी सोमवंशी, सोनिया पटेल, समिक्षा देवणे यांनी बाजी मारली.
५ किलोमीटर शहर खुला पुरूष व महिला गटात अनुक्रमे सुमित चव्हाण, प्रविण जाधव, धनराज क्षीरसागर, गौरी सापते, संस्कृती धावणे, शर्वरी उंबरे यांनी बाजी मारली. १० किलोमीटर खुल्या गटात शुभम राजेभोसले, विष्णू लव्हाळे, प्रथमेश जाधव, शितल तिगाडे, आशा पवार, प्रणिता जाधवर, १० किलोमीटर ३० ते ४५ वयोगटात बाबासाहेब शेरे, श्रीराम देशमुख, भास्कर पाटील, सुमित्रा ढोणे, मयुरी बंडेवार, जयश्री चोले, १० किलोमीटर ४५ ते ६० गटात (खुला) राम लिंबारे, परमेश्वर रुस्तूमजे, वाहेद खान, संगिता उबाळे, डॉ. कल्पना दामा, उषा साठे, १० किलोमीटर ६० वर्षावरील गट दत्तात्रय माने, चांगदेव माने, दिलीपराव देशमुख यांनी बाजी मारली. १० किलोमीटर शहर गट विराज जाधवर, अमित वाघुलकर, ओमराजे मुळे, मानसी कपाळे, संध्याराणी पेठे, भाग्यश्री मिराजदार, ४५ ते ६० गट सुधीर मुळे, हनुमंत माने, संजिव पाटील, महानंदा माने, डॉ. वनिता पाटील, डॉ. अरेफा काझी यांनी यश मिळवले.
२१ किलोमीटर गटातील विजेते
खुला महिला व पुरूष अरुण राठोड, रमेश सुरवसे, रितेश धोत्रे, योगिनी साळुंके, प्रमिला बाबर, आरती झंवर, शहर रनर गट शिवम फुगारे, दत्तात्रय टेकाळे, साहेब पवार ४५ ते ६० गट अतुल भांडवलकर, सुमित नागटीळक, हणूमंत दिक्षित, वैशाली बहिरे, सोनाली साठे ६० वयावरील गट केशव मोटे, दिनकर शेळके, माधव जोशी शहर खुला गट रोहित घरबुडवे, श्रीमंत गुरव, रोहित राठोड, कमल चव्हाण, ३० ते ४५ वयोगट (शहर गट) गंगाधर सोमवंशी, श्रीनिवास सबन, प्रकाश राठोड, विनिता सिंग, भाग्यश्री शिंदे, पल्लवी वळसे, प्रशिला टेकाळे, ४५ ते ६० शहर गट जयप्रकाश कोळगे, जितेंद्र खंडेरिया, संजय मोदाणी यांनी यश मिळवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.