आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी चुरस:येणेगाव-सावदरवाडी येथे 85 टक्के मतदान

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील येणेगाव- सावदरवाडी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरासरी ८५ टक्के मतदान झाले. थेट सरपंच निवडीमुळे मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र होते.निवडणूक प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली असून मतमोजणी मंगळवारी (दि.२०) तहसील कार्यालय सभागृहात होणार आहे. मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत गट पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल व माजी आमदार राहुल मोटे समर्थकांच्या बाणगंगा ग्रामविकास पॅनल मध्ये मोठी चुरस झाली.

ग्रामपंचायतच्या ७ पैकी भैरवनाथ पॅनलचे २ सदस्य निवडणूकीत बिनविरोधात निवडून आले. सर्वांचे लक्ष सरपंच पदाकडे आणि उर्वरित ५ जागेच्या निवडणुक निकालांकडे आहे.मंगळवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून अर्ध्या तासात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.दरम्यान रविवारी सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडले. यात थेट जनतेमधून सरपंच निवडला जाणार असल्याने निवडणूक वेगळी ठरली.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तीन केंद्रामध्ये अगदी शांततेत मतदान पार पडले.मंगळवारी मतमोजणी नंतर विजयाचा गुलाल कोणत्या पॅनलला लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.या मतमोजणीनंतर येणेगाव-सावदरवाडी ग्रामपंचायतीत राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिस व प्रशासकीय पातळीवरील तयारी पूर्ण झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...