आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात मे महिन्याच्या शेवटी जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांत पिण्याचे पाणी टँकरने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्वाधिक टँकर जालना जिल्ह्यात ४२ सुरू असून उस्मानाबाद जिल्ह्यात एकही टँकर नाही. सध्या १०१ गावांत ८७ टँकरने पाणीपुरवठा हाेत आहे. जूनच्या पहिल्या अाठवड्यात मराठवाड्यात ५.१ मिमी पाऊस झाला असून सध्या सिद्धेश्वर आणि शहागड बंधारा वगळता अन्य धरणांत २५ ते ५८ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात दुष्काळ राहत असल्याने दरवर्षी शेकडो गावांसाठी हजारो टँकर लावून करोडो रुपये खर्च करून टँकरने लाखो नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, दोन वर्षांपासून या खर्चावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येत असल्याचे दिसून आले. पाच वर्षांपूर्वी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. तसेच अन्य जिल्ह्यांना टंचाईच्या झळा बसल्या होत्या. आता मात्र, यातून काही प्रमाणात सुटका झाल्याचे चित्र आहे. मात्र, पावसाळ्याच्या ताेंडावर काही जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा हाेत अाहे. ही बाब चिंताजनक असली तरी, येणारा पाऊस आशादायी असल्याने ही चिंता काही दिवसांची असल्याचे बोलले जात आहे.
आठवडाभरात वाढले तब्बल १४ टँकर
मराठवाड्यात एका आठवड्यात १४ टँकर वाढले. त्यात १० टँकर एकट्या जालना जिल्ह्यातील आहेत. तसेच हिंगोलीत २ टँकर वाढले आहेत. त्याचबरोबर नांदेडमध्ये एक टँकर कमी होऊन दोन टँकर बीड आणि नांदेडमध्ये वाढले.
बीड जिल्ह्यात १५७ विहिरींचे अधिग्रहण
एकूण ६९६ गावांसाठी ८०५ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात टँकरसाठी ८३ तर टँकरव्यतिरिक्त ७२२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात सर्वाधिक हिंगोलीत २९२ तर बीडमध्ये १५७ आणि नांदेडमध्ये १४४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.