आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार:सरपंचपदाकरिता 88 तर सदस्यपदासाठी 656 उमेदवार

कळंब4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायतीच्या निवडणुक सरपंच पदा करीता ८८ तर सदस्य पदा करीता ६५६ उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान व २० डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. याही निवडणुकीत सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाला आहे. सध्यातरी प्रत्येक गावात चुरस पहायला मिळत आहे. गावा गावात पॅनल प्रमुखांनी कोणाला उमेदवारी दिली जाईल याची गुप्तता पाळली आहे. यावेळी ग्राम पातळीवर नेत्यांनी सुध्दा कोण कोणत्या पक्षाचे आहे. याला महत्व न देता सक्षम उमेदवार कसा मिळेल याकडे लक्ष दिले आहे.

प्रशासकीय इमारत येथे नामनिर्देशनपत्र भरण्याची सोय करण्यात आली होती. सरपंच पदाच्या तीस जागेसाठी १७४ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. तर २८२ सदस्यांच्या जागेसाठी १०२२ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. छाननी मध्ये एक सरपंच व सहा सदस्य चे नामनिर्देशनपत्र बाद झाले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी १७३ व सदस्य पदासाठी १०१६ नामनिर्देशनपत्र राहिले होते.

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या दिवशी शहरातील प्रशासकीय इमारत परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. पॅनल प्रमुख अनेकांची मनधरणी करत असताना दिसले. तालुक्यातील तीस ग्रामपंचायत च्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्र पत्र वापस घेण्याच्या दिवशी सरपंच पदा करिता भरण्यात आलेले ७३ नामनिर्देशनपत्र काढण्यात आले आहेत. तर सदस्य करीता ३४३ नामनिर्देशनपत्र पत्र काढण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...