आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून १५८ प्रभागासाठी १६६ मतदान केंद्रावर निवडणुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणूकीत ४८ गावांतील ८१ हजार ९९० मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेणार आहेत. यासाठी २८५ बॅलेट युनिट व २१० कंट्रोल युनिटची मागणी निवडणूक विभागाने केली आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर तालुक्यातील मसला खुर्द, वडगाव लाख व खुदावाडी या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह ४१ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. दरम्यान गावागावात प्रचार शिगेला पोहोचला आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला आहे. मतदारसंख्या मर्यादित असल्याने चुरशीच्या लढती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, निवडणूक विभागाने निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. प्राधिकृत अधिकारी तहसीलदार सौदागर तांदळे यांचा मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार अमित भारती, दत्ता नन्नवरे निवडणुकीसाठीची सज्जता करत आहेत.
बोरदनवाडीत फक्त ५३७ मतदार ४८ गावांतील एकूण ८१ हजार ९९० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ४३ हजार ९३१ पुरूष तर ३८ हजार ५९ महिलांचा समावेश आहे. यामध्ये तालुक्यातील काटी ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक ५ हजार २०८ तर बोरनदवाडी नळ गावात सर्वात कमी ५३७ मतदार आहेत.
चार प्रभाग अविरोध तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींमधून मसला येथील सरपंचपदासह दोन प्रभाग अविरोध निवडून आले आहेत. या शिवाय देवसिंगा तुळ व बोरी येथील प्रत्येकी एक प्रभाग अविरोध निवडून आला आहे.
१६६ मतदान केंद्र, प्रत्येक केंद्रावर राहणार चार कर्मचारी तुळजापूर तालुकयातील ४८ ग्रामपंचायतींच्या १५८ प्रभागांसाठी १६६ मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी ४ मतदान कर्मचारी तसेच १०% राखीव मतदान कर्मचारी, याप्रमाणे एकूण ७२८ मतदान कर्मचारी प्रत्यक्ष मतदानासाठी तैनात असणार आहेत. निवडणूक विभागाने मतदानासाठी २८५ बॅलेट युनिट व २१० कंट्रोल युनिटची मागणी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.