आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:165 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी 93  टेबल; 43  फेऱ्यांमध्ये लागणार निकाल

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात ७६.४९ टक्के मतदान झाले. मंगळवारी या ग्रामपंचायतींची मतमोजणी सकाळी आठ वाजेपासून सुरु होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून आठ कार्यालयात ९३ टेबलची सुविधा निर्माण केली असून ५४४ कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ४३ फेऱ्यांमध्ये हा निकाल लागणार आहे. दुपारपर्यंत अंतिम घोषणा पूर्ण होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

महिनाभरापासून जिल्हावासीयांचे लक्ष बनून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. भर थंडीच्या मोसमामध्ये या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांनी उस्मानाबादचे राजकारण तापवले होते. त्यात भावी कारभाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये रंगत चढवल्याने निकालाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. यात प्रशासनाकडून प्रत्येक पावलावर चोख बंदोबस्त करुन ठेवल्याने कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडला नाही. दुसरीकडे पोलिसांची आणि नियुक्त कर्मचाऱ्यांची आज निवडणुकीसाठी वर्दी लावण्याचा अखेरचा दिवस असणार आहे.

या निवडणुकीत अनेक प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुका बनल्या आहेत. त्यामुळे पहिल्या दिवसांपासून अनेक गावांमध्ये काही प्रमाणात तणावाचे तर काही चर्चेचे गुऱ्हाळ दिसून आले. रविवारपासून विविध कयास लावत असलेल्या तज्ञांच्या प्रश्नांची आणि ग्रामस्थांना पडलेल्या कोड्यांची आज सुटका होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून एक दिवस अगोदरच तयारी करण्यात आली असून दुपारपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचा निकाल लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

येथील लढतींकडे लक्ष: परंडा तालुक्यातील एकमेव येणेगाव-सावदरवाडी ग्रामपंचायतीत आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. प्रा. तानाजी सावंत गट पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल व माजी आमदार राहुल मोटे समर्थकांचा बाणगंगा ग्रामविकास पॅनलमध्ये झुंज आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर मध्ये तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गावातील निवडणुकीत तिरंगी लढत झाली. या गावातील निवडणूक पाटील यांच्यामुळे अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

तयारी पूर्ण, मोजणीचे नियोजन
जिल्ह्यातील आठही तालुक्यात अगोदरच मतदान मोजणीसाठी नियोजन करुन ठेवले आहे. त्यासाठी आवश्यक टेबल, कर्मचारी आणि फेऱ्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या निकालांसाठी कोणतीही अडचण येणार नाही. दुपारपर्यंत सर्व निकाल लागू शकतो. त्याप्रममाणे सर्व यंत्रणा सज्ज ठे‌वण्यात आली आहे. -अविनाश कोरडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...