आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:काक्रंबा येथील संजीवनी विद्यालयाचा 95% निकाल; 96 विद्यार्थी परीक्षेस बसले होते

काक्रंबा3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील संजीवनी विद्यालयाचा निकाल ९५ .८३ टक्के लागला आहे. प्रथम ,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ ,पुष्पहार व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. ९६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.

त्यापैकी ९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विशेष प्रावीण्यामध्ये २४ विद्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये ३३ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी मध्ये २६ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी ९ उत्तीर्ण झाले आहेत. कु.स्वप्नाली महादेव देवगुंडे ९५.%, कु.ज्ञानेश्वरी विनोद गायकवाड ९४.२०%, स्वप्नाली हेमंत वाघमारे ९३.२०% कु.पुजा कृष्णाथ क्षिरसागर, कु.श्रीवणी मारुती साठे, या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष लिंगाप्पा चंदनशिवे,सचिव बळीराम सुरवसे, रामचंद्र बंडगर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव वसंत गुरव,कोषाध्यक्ष रामचंद्र कानडे, रामचंद्र कोळेकर मुख्यध्यापक तुकाराम देवगुंडे, गोपाळ कुरनुरकर, नितीन पवार,राम भोसले, व्यकंट शिंदे, किरण वाघमारे, प्रसाद धर्माधिकारी, प्रफुल झाडे, आर.एच.वाघमारे, यु. ए. माने, पी.सी.ठोकरे,व यु. आर. डोंगरे आदीसह पालक विद्यार्थी शिक्षक उपस्थितीत होते.

बातम्या आणखी आहेत...