आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात आयोजित शिवनेरी चषक क्रिकेट स्पर्धेत ९६ राज्यभरातील ९६ संघांमध्ये रस्सीखेच आहे. येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावर मागील २० दिवसांपासून सुरू असलेली ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. मागील आठ वर्षांपासून शिवनेरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा नेते किरण गायकवाड ही स्पर्धा घेत आहेत. बक्षिसांची रक्कम लाखोंच्या घरात असल्याने मुंबई, पुणे, कलबुर्गी, सोलापूर, लातूरसह बाहेर राज्यातील दिग्गज खेळाडू असलेले संघ शिवनेरी चषक क्रिकेट स्पर्धा सहभागी झाले आहेत.
विजेत्या संघासह उत्कृष्ट संघ व खेळाडूंना पावणेसात लाखांहून अधिक रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे. राज्यस्तरीय प्रथम येणाऱ्या संघास दोन लाख ५० हजार आणि तालुकास्तरातून प्रथम येणाऱ्या संघाला एक लाख ११ हजार रुपयांचे पारितोषिक आणि शिवनेरी चषक देवून सन्मानित करणार. राज्यस्तरीय द्वितीय बक्षीस एक लाख ५१ हजार आणि ग्रामीण द्वितीय बक्षीस ७१ हजार रुपयांचे आहे. सर्वोत्तम खेळाडूला दोन्ही गटातून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. सोबतच सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांनाही बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेचे प्रमुख संयोजक सागर शिंदे, डॉ. सुजित पाटील, बापूराव गायकवाड आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश तपसाळे, साई विभुते, ज्ञानेश्वर सांगवे, ओम जगताप, शरद पवार, सचिन जाधव, हैदर शेख यांच्यासह पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. शिवनेरी चषकाचे पारितोषिक वितरण शनिवारी (दि.७) होणार आहे. १५ हजार क्रिकेटप्रेमींना स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी निवाऱ्यासह विविध सुविधा उपलब्ध केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.