आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना पॉझिटिव्ह:उमरगा तालुक्यात ऑगस्टच्या 18 दिवसांत 97 कोरोना पॉझिटिव्ह

उमरगा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात ऑगस्टच्या १८ दिवसात ९७ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जूनमध्ये ४० कोरोना रुग्ण आढळले होते. जुलै महिन्यात २१२ कोरोना रुग्ण आढळून आले. तालुक्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेत जूनपासून आतापर्यंत ३४९ कोरोना रुग्ण आढळले आहेत.

तालुक्यात याच कालावधीत ३४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या आठ रुग्ण उपचार व गृहविलगीकरणात आहेत. तालुक्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.४२ टक्के तर मृत्यूचा दर ०.२९ टक्क्यांवर आल्याने उपचारात २.२९ टक्के रुग्ण आहेत.

गुरुवारी (दि. १८) उपजिल्हा रुग्णालय, मुरुम ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य विभागामार्फत घेण्यात आलेल्या १०६ अँटीजेन चाचणीत एक पॉझिटिव्ह तर ६४ स्वॅब अहवालात शून्य पॉझिटिव्ह आलेत. ग्रामीण भागात बलसूर येथे एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. आतापर्यंत चौथ्या लाटेमध्ये ३४९ पॉझिटिव्ह आले असून शहरात १४७ जण पॉझिटिव्ह, ग्रामीण भागात २०२ पॉझिटिव्ह आलेत. कोरोना संसर्गाच्या चौथ्या लाटेत ३४० कोरोनामुक्त झाले तरएकाचा मृत्यू झाल्यामुळे सध्या केवळ आठ रुग्ण उपचारात आहेत. गुरुवारी ७५ स्वॅब तपासणीस पाठविले असून शुक्रवारी (दि.१९) रात्री उशिरापर्यंत अहवाल आला.

बातम्या आणखी आहेत...