आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:18 दिवसांत 98 दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद, बीड व लातूर या तिन्ही जिल्ह्याची तहान भागवणारा मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने मांजरा पट्ट्यात आनंदाचे वातावरण आहे. प्रकल्पाची झोळी भरल्यानंतरही पाऊस सुरु राहिल्याने प्रकल्ापतून १८ दिवसांत ९८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला.

उस्मानाबाद-बीड जिल्ह्याच्या सीमेवर सन १९८० मांजरा धरण उभारण्यात आले. या धरण परिक्षेत्रात जास्त पाउस झाला व हे धरण भरले तर या धरणाच्या लाभक्षेत्रात ९० किमीचा डावा कालवा व ७८ किमीचा उजव्या कालव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे १८२२३ हेक्टर लाभक्षेत्रातील शेतीला पाणीपुरवठा होतो. बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात येथून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लातूर शहर, औद्योगिक वसाहत, कळंब, केज, धारूर, अंबाजोगाई, मुरूडसह अनेक गावातील लोकांची तहान भागत आहे. मागील काही दिवसांपूर्वी मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसामुळे वरच्या बाजुला असलेले २६ लहान-मोठे तलाव भरल्यावर धरणार पाण्याची आवक वाढली होती. धरणाच्या उजव्या कालव्यातून व दरवाजामधून पाणी सोडण्यात आले आहे.

मांजरा प्रकल्प २२४. ०९३ दलघमी क्षमतेचा आहे. यंदा प्रारंभी आवक कमी होती. १६ ऑक्टोबर रोजी प्रकल्प भरल्यानंतर उजव्या कालव्यातून विसर्ग नदीपात्रात सोडला होता. तेव्हापासून आजतागायत या १८ दिवसांत उजव्या कालव्यातून ०.६५ दलघमी, दरवाज्यातून ९८.३७ दलघमी एकुण ९८.२५ दलघमी पाण्याचा विसर्ग झाला आहे.

हॅट्रीक पूर्ण झाली
मांजरात प्रथम १९८० साली ९७ दलघमी पाणीसाठा झाला. यानंतर १९८८ मध्ये प्रकल्प प्रथम भरला. पुढे १९८९, १९९० असे सलग दोन वर्षे ओव्हरफ्लो होता. मांजरा प्रकल्पाने हॅट्रीक केली होती. त्यानंतर अनेक वर्षानंतर पुन्हा हा योग जुळून आला. सन २०२०, २०२१, २०२२ या तीन वर्षांत हॅट्रिक साधल्या गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...