आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्माघाताचा बळी:केज तालुक्यातील 50 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू, तापमान वाढतच असून पुढील तीन दिवस धोक्‍याचे

कळंब5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात तापमान वाढतच असून, हासेगाव (केज) येथील लिंबराज तुकाराम सुकाळे (५० वर्षे) या शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर मजूर शेतात उन्हात कडबा बांधून पाणी पिल्याने उष्माघाताने बळी घेतला आहे. जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांहून अधिक झाला असून, आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लिंबराज तुकाराम सुकाळे यांनी हासेगाव (केज) येथे शेतात दुपारी १२ वाजेपर्यंत कडबा बांधला. त्यानंतर गावात येऊन त्यांनी भर उन्हात घराच्या मेढी (सिमेंट खांब) लावल्या. दुपारी २ वाजेच्या दरम्यान अंदोरा येथे जाऊन जनावरांना पाणी पाजण्यासाठी जात असताना हासेगाव (केज) येथील साई जिनिंगजवळ अचानक चक्कर आल्यामुळे ते एका झाडाखाली जाऊन बसले.

थकवा जाणवू लागल्याने सुकाळे यांनी लागलीच पाणी प्राशन केले.यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ४ वाजेच्या दरम्यान शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्थानिक रुग्णालयातील डॉ.बालाजी आदमपुरकर यांनी प्राथमिक तपासणी केली असता सुकाळे यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पाच वाजेच्यादरम्यान शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती डॉ. पुरुषोत्तम पाटील यांनी दिली.

दरदरून घाम, थकवा आल्यास उष्माघात
चक्कर, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम, थकवा येणे आणि स्नायूंना आकडी येणे अशी आहेत. म्हणजे प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरिक तापमान (१०४ डिग्रीपेक्षा जास्त). घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा गरम, कोरडी होते. घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते, रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो. शरीरात ताठरता येते, हात आणि पायात आकडी येतात, मानसिक बदल होतो, चिडचिड होते, भ्रम होतो आणि कोमा म्हणजेच बेशुद्धवस्था येते आणि मृत्यू ओढवू शकतो. हे असे क्रमाक्रमाने होते, बेशुद्धवस्था हा वयस्कांमध्ये उष्माघातचा पहिला संकेत असू शकतो, असे वैद्यकीय अधिकारी सांगतात.

बातम्या आणखी आहेत...