आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुळजापूर तालुक्यातील तुळजापूर-नळदुर्ग रस्त्यापासून आतमध्ये दोन किलोमीटरवर असलेल्या बोरनदीवाडी गावालगत एका शेतात सुमारे दीड एकर क्षेत्रावर महाकाय वटवृक्ष उभा आहे. ४ पिढ्यांपासून म्हणजे सुमारे दीडशे वर्षांची साक्ष देत या झाडाचा विस्तार सुरूच आहे.झाडाची फांदी तोडाल तर अंध व्हाल, असा भीती (अंधश्रद्धा) असल्याने गावकरी किंवा कुणीही झाडाचे पानही तोडण्याचे धारिष्ट्य दाखवत नाही, हे विशेष. तुळजापूर तालुक्यातील बोरनदीवाडी शिवारात महादेव गायकवाड यांच्या शेतात दीड एकरावर वडाचे भव्य झाड असून, बोरी नदीकाठी असलेल्या या झाडाचा जुना इतिहास आहे. राज्यात इतक्या भव्य अाकाराचे झाड दुर्मिळ असून, त्यामुळेच गावकऱ्यांनी या झाडाचे काळजीपूर्वक संरक्षण केले. झाडांच्या पारंब्या वाढतच असून, त्यामुळे विस्तार वाढतच आहे. या झाडालगतच जुने पिंपळ असून, त्याचाही आकार वाढत आहे.
हे झाड आमच्यासाठी भूषण आहे. महाराष्ट्रभर फिरलो, मात्र असे अवाढव्य झाड पाहिले नाही. झाडाचे नेमके वर्ष कुणालाही सांगता येत नाही. मात्र, चार पिढ्यांपासून हे झाड असल्याचे सांगितले जाते. दीड एकरपेक्षा अधिक आकाराचे हे झाड गावकऱ्यांना सावली, समाधान देते. उन्हाळ्यात गावकरी दिवसभर या झाडाच्या सान्निध्यात असतात. पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचे महत्त्व आहेच. मात्र, झाडाची फांदी तोडल्यास व्यक्ती अंध होते, अशी श्रद्धा किंवा भीतीमुळे झाडाला कायम संरक्षण मिळत गेले, असे सरपंच सुरेश शिंदे यांनी सांगितले.
श्रद्धापूर्वक संगोपन महादेव गायकवाड यांच्या शेतात असलेल्या या झाडाच्या मध्यभागी महादेवाची पिंड आहे. पाच बाय पाच आकाराच्या कट्ट्यावर ही पिंड स्थापित करण्यात आली आहे.विशेष म्हणजे झाडाच्या मध्यभागी असूनही पिंडीवर झाडाची एकही फांदी आलेली नाही. दरवर्षी श्रावणात पिंडीची पूजा केली जाते. गावकरी श्रद्धापूर्वक पिंडीसह झाडाचे संगोपन करत आहेत.
३० फुटांहून उंच, कवेत घेतला दीड एकर भाग बाेरी गावापासून बोरी नदीचा उगम झाला. या नदीवरच नळदुर्ग जवळच्या नदीवर बोरी धरण बांधले आहे. बोरी नदीच्या काठावरच बोरनदीवाडी हे ८०० लोकसंख्येचे गाव आहे. गावालगत आणि नदीशेजारी गायकवाड यांच्या शेतात वटवृक्ष असून, ३० फूट उंच पारंब्या अाणि दीड एकरवर पसरलेल्या या झाडामुळे परिसर रमणीय वाटतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.