आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सराफ दुकानात चोरीचा अयशस्वी प्रयत्न

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा शहरातील कृष्णा ज्वेलर्समध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात चोरटे सर्व साहित्यासह आले. परंतु दुकानाशेजारी असलेल्या दुचाकी मेकॅनिकच्या समयसूचकतेमुळे अज्ञात चोरट्यांचा हा प्रयत्न फसला आहे. या घटनेमुळे शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी पहाटे साधारणतः अडीच ते तीन च्या दरम्यान एका कारमधून अज्ञात चोरटे आले होते. जवळपास पाच जण होते. त्यांनी गाडीतून उतरून गॅस कटरच्या साहाय्याने ज्वेलर्स च्या दुकानाचे कुलूप तोडण्यास सुरुवात केली. या ज्वेलर्स च्या शेजारी कृष्णात पाटील यांचे दुचाकी दुरुस्तीचे दुकान आहे. या दुकानात मोबाईल बघत होते. समयसूचकता दाखवत त्यांनी आपल्या मोबाईल वरून १०० नंबर डाईल करून पोलिसांना याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा फोन लागला नाही. पाटील यांनी ज्वेलर्स च्या मालकाला एका पाठोपाठ सहा ते सात वेळा कॉल केला. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे कृष्णा ज्वेलर्सच्या मालकाला लक्षात आले. त्यांनी सोबत दोघांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. चौकात आल्यानंतर त्यांनी जोरात ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने आलेले ते अज्ञात चोरटे गाडीत बसून पसार झाले.

त्यानंतर लोहारा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर, शैलेश पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओव्हळ आदींनी भेट देऊन पाहणी केली.

कृष्णात पाटील यांची समयसूचकता
कृष्णात पाटील यांच्या दुकानासमोर एक चोरटा हातात तलवार घेऊन उभा होता. फोन करून बोलताही येत नव्हते. त्यामुळे त्यांनी ज्वेलर्स च्या मालकास फोन केला. त्यांनी फोन रिसिव्ह केला पण पाटील काहीच बोलले नाहीत. त्यानंतर ज्वेलर्सच्या मालकाने दुकानाचे सीसीटीव्ही आपल्या मोबाईल मध्ये ओपन करून बघितले. व हा प्रकार लक्षात आला. कृष्णात पाटील यांनी दाखवलेल्या या समयसूचकतेमुळेच चोरट्यांचा उद्देश फसला.लोहारा शहरातील सर्व चौकांमध्ये ऑनलाईन सीसीटीव्ही बसविण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक श्रीनिवास फुलसुंदर यांनी केली आहे. लोहारा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...