आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासाचा आढावा:फक्राबाद सरपंचांवरील गोळीबार प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल ; सरपंचावर गोळीबार होण्याची पहिलीच घटना

वाशी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील फक्राबाद येथील सरपंचांच्या गाडीवर शुक्रवारी गोळीबार केल्याप्रकरणी दोघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा झाला. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शनिवारी (दि.१८) प्रत्यक्ष भेट देऊन घटनेच्या तपासाचा आढावा घेतला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड शुक्रवारी कामानिमित्त रात्री ९.३० च्या सुमारास येत असताना त्यांच्या गाडीला हात दाखवत दोघांनी समोरुन गोळीबार केला होता. रात्री उशिरा बिक्कड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला. घटनेनंतर वाशी पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली होती. शनिवारी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, भूमचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे रामेश्वर खनाळ, फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन पाहणी केली. अधीक्षक कुलकर्णी यांनी स्वतः बिक्कड यांच्याकडून घटनेबाबत माहिती घेत तपासाच्या सूचना केल्या. पोलिसांना घटनास्थळी बंदुकीच्या झाडलेल्या गोळीचे काडतूस सापडल्याचे समजते. परंतु तपासाचा भाग असल्याचे सांगत पोलीस निरीक्षक सुरेश दळवे यांनी अधिकची माहिती देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाचा तपास फौजदार पवन निंबाळकर हे करत आहेत. भूम तालुक्यात एखाद्या सरपंचावर गोळीबार होण्याची पहिलीच घटना असल्याने विविध चर्चांना तोंड फुटले आहे.

बातम्या आणखी आहेत...