आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र उत्सव:पोलिसांना अडथळा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल ; भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत होते फायदा

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापुरात वाहनांची व्यवस्था करण्यासाठी पार्किंग सुविधा लावण्याचे काम करत असलेल्या पोलिसांवर कोयता उगारत कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार नवरात्र उत्सव निमीत्ताने सातारा येथील महामार्गाचे पोलिस हवालदार रवींद्र कचरे मंगळवारी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील पावनारा गणपती मंदिराजवळ रस्त्यावर कर्तव्यास होते. यावेळी दुचाकी क्रमांक एमएच १३, बीएल २६१५ वरून दोन अनोळखी पुरुष आले. त्यांनी दुचाकी अडथळा निर्माण होईल अशा तऱ्हेने लावली. यावर कचरे यांनी त्यांना हटकले असता, त्या दोघांनी “तु मला कोण विचारणार.” ?असे कचरे यांना म्हणून अरेरावीची भाषा वापरली. तसेच त्यांच्याजवळील पिशवीतून लोखंडी कोयता काढून कचरे यांच्या अंगावर धावून गेले.

हा प्रकार कचरे यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण करण्याचा होता. यावेळी कचरे यांनी प्रसंगावधान राखून त्यांच्या जवळील कोयता काढून घेतला. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचा फायदा घेऊन ते दोघे दुचाकी जागेवरच सोडून तेथून पसार झाले. या प्रकरणात पोलिसांनी दुचाकी व कोयता ताब्यात घेतला.

बातम्या आणखी आहेत...