आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल‎:हरिणवर्गीय प्राण्याचे मांस विक्री‎ करणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल‎‎

उस्मानाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरिणवर्गीय प्राण्याचे मांस विक्री‎ करत असल्याची गुप्त माहिती ‎मिळाल्याने वन विभागाच्या ‎ ‎ कर्मचाऱ्यांनी कारवाई करून दोन ‎ ‎ आरोपींविरुध्द वनपरिक्षेत्र कार्यालय ‎ ‎तुळजापूर येथे गुन्हा दाखल झाला‎ आहे. आरोपीचा पुढील तपास‎ सहाय्यक वनसंरक्षक व्ही. बी. तांबे,‎ वनपरिक्षेत्र अधिकारी तुळजापूर बी.‎ ए. चौगले, वनपाल रा. मा. शिंदे‎ करीत आहेत.

‎गुप्त माहितीच्या आधारे विभागीय‎ वन अधिकारी बी. ए. पोळ,‎ सहाय्यक वनसंरक्षक व्ही. बी. तांबे‎ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र‎ अधिकारी बी. ए. चौगले,‎ उस्मानाबाद वनपाल रा. मा. शिंदे,‎ तुळजापूर वनपाल एम. बी. घोरपडे,‎ वनरक्षक एस. एच. साळुंके, एम.‎ बी. सुतार, वनरक्षक एम. ए. माने,‎ के. यु. साबदे व वनकर्मचाऱ्यांनी‎ आरोपी सारोळा येथील जितूसिंग‎ शेरसिंग राजपूत, लोहारा‎ तालुक्यातील मार्डी येथील दिनकर‎ मधुकर देवकर या दोघांनी ३१‎ डिसेंबर रोजी करजखेडा चौरस्ता‎ (ता. उस्मानाबाद) येथे हरिणवर्गीय‎ प्राण्याचे मांस काळ्या कलरच्या‎ पॉलिथिन बॅगमध्ये छोटे तुकडे‎ करून विक्री करत असल्याची गुप्त‎ माहिती मिळाली.

गुप्त माहितीच्या‎ आधारे धाड टाकून आरोपीस‎ अटक करण्यात आली. सदर‎ गुन्ह्यातील मुद्देमाल हरिणवर्गीय‎ प्राण्याचे मांस, दुधाचे मोठे कॅन,‎ गुन्ह्यातील दोन दुचाकी आदी‎ साहित्य जप्त केले असून सदर‎ आरोपीच्या विरोधात वनपरिक्षेत्र‎ कार्यालय तुळजापूर येथे गुन्हा‎ नोंदवण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...