आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:पिंपळवाडी ब्रह्मगाव येथे एक दिवस बळीराजासाठी

परंडा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळवाडी, ब्रह्मगांव, आसू भांडगाव येथे “एक दिवस बळीराजासाठी” अभियान राबवण्यात आले. तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रूपनवर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.शेतात जाऊन केळी, पपई, संत्रा, कांदा पिकाची पाहणी केली. आरणंगाव, राजुरी, जवळा (नि.) जाकेपिंपरी, टाकळी येथील शेतकऱ्यांची भेटी घेत तुती व फळबाग लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

गावनिहाय प्रशासकीय आदेशानुसार शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केेले. यावेळी सरपंच अलका भोसले, सरपंच ओव्हाळ, उपसरपंच काळे, जिल्हा समन्वयक शिल्पा भंडकुभे, ग्रामसेवक तरकसे, प्रगतशील बागायतदार सुनील अंधारे, शेतकरी उद्योजक विकासराव रणनवरे, लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, कृषी सहायक जाधव, सुधीर देडगे, मयुर करळे, तुषार गायकवाड, नागनाथ भोसले, रोजगार सेवक माऊली सुनील आहेर, शशिकांत कुलकर्णी, दादा डाकवाले जाधव, शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...