आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी येथील शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयात जन्मलेल्या १० कन्यारत्नांचे हर्षोल्हासात स्वागत करत अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीकडून कन्यारत्नांना प्रत्येकी दोन ड्रेस व मातांना शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. तसेच ज्या माता आपल्या मुलींचे नाव अहिल्या ठेवतील त्यांच्या नावे समितीकडून बँकेत ठेव म्हणून ११ हजार रुपये रक्कम ठेवली जाणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. यातील दोन दांपत्यांनी आपण मुलीचे नाव अहिल्या ठेवणार असल्याचे समितीला सांगितले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संजय सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आयशा पठाण, अॅड. विद्या वाघमारे, रिबेका भंडारे, मानसी डोलारे, सोनाली काकडे, उषा लांडगे, राजनंदा वाघमोडे, दीपाली डुकरे, संगीता डुकरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संतोष पाटील यांनी केले. मुलगा आणि मुलगी समानता येण्यासाठी, मुलीला पुढे प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी पालकांची मानसिकता हळूहळू बदलत असल्याचे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराने मुलींनासुद्धा घडवण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे प्रा.मनोज डोलारे,प्रा. सोमनाथ लांडगे, प्रा.बालाजी काकडे, संदीप वाघमोडे, नवनाथ काकडे, गणेश एडके, मोहन रत्ने, समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे यांनी पुढाकार घेतला. या वेळी कन्यारत्नांच्या पालकांसमवेत शासकीय जिल्हा स्त्री रुग्णालयातील कल्पना भाटे, सुनीता भालेराव, शोभा माळी, रशीद काझी, गिरिजा परसे, सोनटक्के आदी कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या वर्षी मुस्लिम कुटुंबाने मुलीचे नाव अहिल्या ठेवले
^महिलांमध्ये अहिल्यादेवींचे विचार पाेहोचावेत आणि त्यांनी प्रेरणा घ्यावी, असा या उपक्रमामागील हेतू आहे. वास्तविक पाहता अहिल्यादेवींचे कार्य सर्व जाती-धर्मासाठी होते. म्हणून मुलीचे नामकरण कोणत्याही समाजात केले जाऊ शकते. अशा सर्वच कुटंुबांतील संबंधित मुलींच्या नावे समितीच्या वतीने ११ हजार रुपये ठेव ठेवणार आहोत. गेल्या वर्षी शहरातील एका मुस्लिम कुटंुबानेही आपल्या मुलीचे नाव अहिल्या ठेवले. अहिल्या नाव ठेवणाऱ्या मुलींचे प्राथमिक शिक्षणही समितीच्या वतीने मोफत केले जाणार आहे.
- प्रा. मनाेज डोलारे, समिती मार्गदर्शक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.