आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनयात्रा:नापिकीमुळे कोळेवाडीतील शेतकऱ्याची आत्महत्या ; हातातोंडाशी आलेले पीक गेले होते वाया

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सतत नापिकीमुळे निराश होऊन उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी येथील शेतकऱ्याने आत्महत्या करून जिवन यात्रा संपवली आहे. राजेंद्र पिराप्पा आदटराव (६०) या शेतकऱ्याची दोन एकर जमीन आहे. त्यांनी यावर्षी सोयाबीन पेरले होते. परंतु, अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. मात्र, नुकसान भरपाईपोटी शासनाने घोषीत केलेले अनुदान अद्यापही मिळाले नाही. पत्नी व दोन मुलांसह राजेंद्र आदटराव हे हलाखीचे जीवन जगत होते. सततच्या नापिकीमुळे त्यांनी अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करून जीवनयात्रा संपवल्याचे समजते. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने राजेंद्र आदटराव यांनी शुक्रवारी (दि.४) बांधावरील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. या घटनेची नोंद ढोकी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पुढील तपास बीट अंमलदार प्रकाश राठोड करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...