आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शॉर्टसर्किटमुळे आगीत 10 एकरांतील ऊस जळाला

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • मुख्याधिकारी येलगट्टेंनी खासगी टँकरद्वारे पाणी मागवून आगीवर मिळवले नियंत्रण

विद्युत तारांच्या घर्षणामुळे पडलेल्या ठिणग्यांमुळे उस्मानाबाद शिवारातील १० एकर उसाच्या फड आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. उस्मानाबाद नगरपालिकेचे प्रशासक हरिकल्याण येलगट्टे यंानी टँकरद्वारे पाणी मागवून आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, तेथेच असलेल्या भंगाराच्या दुकानाच्या साहित्याचीही आगित राख झाली. हा प्रकार शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडला.

शेतात उभ्या उसाच्या फडाचे गाळप करण्यासाठी कारखान्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. त्यातच अनेक शेतकऱ्यांचे उसाचे फड आता आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. शहरातील सांजा रोड बायपास मार्गावरील औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्रीकांत महाजन यांच्या गट नं.३४८ या शेतातील १० एकर क्षेत्रावर उसाची लागवड केलेली आहे. ऊस पूर्णपणे तोडणीस आला आहे. शुक्रवारी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास शेतात असलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन झालेल्या शॉर्टसर्किटमुळे या उसाच्या फडास आग लागली.

आग झपाट्याने सर्वत्र पसरुन तिने काही क्षणातच आपले उग्ररूप धारण करुन संपूर्ण उसाच्या फडाचे क्षेत्र आपल्या कवेत लेपेटून घेतले. उत्पादक शेतकरी डोळ्यादेखत उसाच्या फडाची राखरांगोळी होत असताना फक्त आरडाओरडा करून बघण्यापलिकडे काहीही करू शकला नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषद अंतर्गत असलेल्या अग्निशमन विभागाचे २ बंब व कळंब येथील अग्निशमन गाडी जवानांसह घटनास्थळी तात्काळ दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांनी अग्निशमन व्यतिरिक्त इतर खासगी ४ टँकरद्वारे पाणी मागवून ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी पराकाष्टा केली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. या फडालगत असलेल्या फय्युम शेख यांचे भंगाराचे दुकान देखील आगीत जळून खाक झाले.

यांनी केले शर्थीचे प्रयत्न
ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे भारत साळुंके, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही.एस. जयस्वाल, नगर परिषदेचे विलास गोरे, सुदाम खरात, दत्ता भोजगुडे, संभाजी साळुंके, दत्ता हराळे, विकास माने (पाणीपुरवठा), सुबोध कुलकर्णी अख्तर शेख, पोलिस कर्मचारी एस.बी. शेंडगे, सुधीर मुगळे, कळंब अग्निशमन विभागाचे नितीन गायकवाड आदींसह अन्य कर्मचाऱ्यांनी व‌ नागरिकांनी अथक प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...