आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सह्याद्री इंटरनॅशनल स्कूल आणि सेव्हन वंडर्स प्रि- स्कूल धाराशिव येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्रा.डॉ.रमेश दापके देशमुख यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक नादेरउल्लाह हुसैनी , हजरत शम्सोद्दीन गाजी( रहे) वेलफेअर सोसायटी , ॲड.अजित खोत, फिरोज पल्ला अंजुमन वेलफेअर सोसायटी,डॉ दिग्गज दापके देशमुख डॉ.वसुधा दिग्गज दापके देशमुख यांची व इतरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा इंगळे यांनी केले. यावेळी शाळेमध्ये वर्षभरात घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा आणि परीक्षांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये त्यांनी पारंपारिक नृत्य , दिंडी नृत्य, पंजाबी नृत्य ,गोंधळीनृत्य, देशभक्तीपर नृत्य अशा विविध प्रकारच्या नृत्यांचा कलाविष्कार सादर केला. यावेळी इ.८ वी मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदना पर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी पारंपारिक नृत्य, लोकनृत्य ,दिंडी नृत्य, पंजाबी नृत्य, गोंधळी नृत्य , देशभक्तीपर नृत्य, बालगीतपर नृत्य अशा विविध प्रकारच्या नृत्यांचा कलाविष्कार सादर केला. यावेळी इ.तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दिंडी नृत्याने प्रेक्षकांचे मन वेधून घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका मनीषा खांडेकर आणि पूजा भोयटे यांनी तर आभारप्रदर्शन प्रियंका कुदळे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.