आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरगा-लोहारा तालुका मागासवर्गीय वस्त्यांसाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला असून कानेगाव मागासवर्गीय वस्तीसाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार ज्ञानराज चौगुले यांची पत्र काढून सोमवारी (६) दिली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२२-२३ अंतर्गत उमरगा-लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागातील ३९ गावांतील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये संविधान भवन, बुद्ध विहार, मागासवर्गीय स्मशानभूमी, अंतर्गत रस्ते, गटारी आदी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजुर करून घेतल्याची माहिती पत्रकाद्वारे आमदार चौगुले यांनी दिली आहे. कामांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठपुरावा केला होता.
बेडगा येथे बौध्द विहार बांधकाम करण्यासाठी दहा लाख, मळगी येथे बौध्द विहार बांधकाम करण्यासाठी दहा लाख रुपये तसेच तुगाव, कसगी, तुरोरी, नाईचाकूर, कंटेकुर, कोथळी, केसरजवळगा, चिंचोली ज., चिंचोली भू., येणेगूर, मुळज, डिग्गी, समुद्राळ, हिप्परगा राव या गावांत मागासवर्गीय वस्तीत अंतर्गत रस्ता व गटार करणे या कामांसाठी प्रत्येकी दहा लाख असा एकूण पाच कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. सदर निधी मंजूर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आभार मानले आहेत.
कानेगाव येथे एक कोटी निधी मंजूर
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे संविधान भवन बांधण्यासाठी ४० लाख, अंतर्गत रस्ते व नाली करण्याच्या कामासाठी ६० लाख असा एक कोटीचा निधी मंजूर झाला असून कास्ती बु., खेड, उंडरगाव, धानुरी, काटे चिंचोली, तावशीगड, उदतपुर,भोस गा,दस्तापू र,जेवळी उत्तर, एकोंडी (लो), तोरंबा, हिप्परगा सय्यद, विलासपूर पांढरी, वडगाव गांजा, माळेगाव, अचलेर, आष्टा कासार या गावांत अंतर्गत रस्ते व नाली कामासाठी प्रत्येकी १० लाख रुपये. उमरगा तालुक्यात गुंजोटी येथे अंतर्गत रस्ता व गटार करण्यासाठी २० लाख, येळी अंतर्गत रस्ता व गटार करणे २० लाख, व्हंताळ येथे मागासवर्गीय स्मशानभूमी विकसित करण्यासाठी दहा लाख मंजूर करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.