आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​नियोजनासाठी आज बैठक:स्वातंत्र्यदिनी उस्मानाबादेत काढणार भव्य शोभायात्रा

उस्मानाबाद10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात स्वातंत्र्याचा ‘अमृत मोहत्सव’ साजरा करत असताना उस्मानाबाद शहरातही भव्य शोभायात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या नियोजनासाठी नागरिक व अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी ११.३० वाजता होणार आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

आगामी स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करण्याचे नियोजन केले आहे. यानिमित्त शोभायात्रा काढण्यात यावी अशी संकल्पना अनेकांकडून व्यक्त झाली होती. त्या अनुषंगाने शहरात भव्य शोभायात्रा काढण्याचे ठरले आहे. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्व जाती व धर्माचे प्रतिनिधी यांच्यासह मुंबईहून आलेले पथक सहभागी होणार आहे. मराठमोळ्या वेशभूषेत महिलांचा व युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महिलां व मुलींचे लेझीम, ढोल-ताशांचे पथक, बाईक रॅली, तलवार व दांडपट्टाचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहेत. नियोजनासाठी शहरातील जेष्ठ व प्रतिष्ठीत नागरिक, विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, जयंती उत्सव व गणेश मंडळाचे प्रतिनिधी आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.