आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोखंडी रॉडने मारहाण:कोर्टाच्या आवारातच वकिलाला मारहाण

उमरगा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या विरुद्ध मंडळ अधिकाऱ्याला फिर्याद का द्यायला लावलीस म्हणून न्यायालयाच्या आवारातच वकीलावर लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या मातोळा येथील एकाविरुद्ध मंगळवारी (दि.२) गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार नारंगवाडी येथील दगडू माणिकराव सांगवे (५७) उमरगा न्यायालयात वकील आहेत. न्यायालयाच्या आवारात मंगळवारी कामकाजादरम्यान दुपारी दोनच्या सुमारास मातोळा येथील सतीश त्र्यंबक भोसले हा हातात लोखंडी रॉड घेवून आला व ‘माझ्याविरुद्ध मंडळाधिकाऱ्यास फिर्याद द्यायला का लावली, असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने लोखंडी रॉडने सांगवे यांच्या डोक्यात डाव्या बाजुला मारल्याने डावा कान व कानाच्या मागील बाजूला गंभीर मार लागला. जवळच असलेले वकील पृथ्वीराज जाधव, नेताजी शिंदे, सुधाकर दामावले यांनी त्यांना सोडवले. आरोपी सतीश भोसले पळून गेला. दगडू माणिकराव सांगवे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी सतीश त्र्यंबक भोसले यांच्याविरुद्ध उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. बी जाधवर करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...