आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूल:जिल्ह्यामध्ये वयोमर्यादा संपलेल्या वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कात मोठी वाढ; बस आणि ट्रकसाठी 17.5 पट वाढ

उस्मानाबाद3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक वाहनाची वयोमर्यादा निश्चित केली असून ती सरासरी पंधरा वर्षे ठरली आहे. यापूर्वी वयोमर्यादा संपलेल्या वाहनांची फिटनेस (योग्यता) चाचणी करुन ती वाहने पुनर्नोंदणी करण्यासाठी जे शुल्क आकारले जायचे, त्यात एक एप्रिलपासून मोठी वाढ झाली आहे. ही शुल्क वाढ ३.२५ ते १७.५ पट झालेली आहे. या शुल्क वाढीचा वाहन मालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. यामध्ये सर्वाधिक १७.५ पट शुल्क वाढ (ट्रान्सपोर्ट) ट्रक व बसमध्ये झालेली आहे. यामुळे तीन महिन्यात तीन लाख ७८ हजार महसूल जमा झाला. केंद्र सरकारने ४ ऑक्टोबर २०२१ ला या शुल्कवाढीसंदर्भात परिपत्रक काढले होते.

त्यानुसार उस्मानाबाद आरटीओत ही वाढीव शुल्क आकारले जाण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये पंधरा वर्षाची वयोमर्यादा संपलेल्या वाहनांचे फिटनेस (योग्यता) व रजिस्ट्रेशन (पुनर्नोंदणी) या शिर्षामध्ये वाढ झाली आहे. वयोमर्यादा संपलेल्या वाहनांचे फिटनेस झाल्याशिवाय रजिस्ट्रेशन होवू शकत नाही. त्यामुळे वाढीव शुल्काचे आणि जुन्या शुल्काचे विचार केल्यास झालेली शुल्कवाढ ही ३ पटीपासून ते १७.५ पटीपर्यंत झालेली आहे.

दरमहा ३०० रुपये पर्यंत दंड लागू : बस किंवा ट्रकची (ट्रान्सपोर्ट) वयोमर्यादा संपल्यानंतर आरटीओमध्ये फिटनेस प्रमाणपत्रासाठी वाहन न नेल्यास ट्रान्सपोर्ट शीर्षाखालील मोठ्या वाहनांना प्रति दिवस ५० रुपये दंड लावण्यात येणार आहे. पूर्वी हा दंड केवळ दोनशे रुपये होता. त्यामध्ये वाहन कितीही उशिरा नेले तरीही दंड मात्र २०० रुपयेच रहायचा. तसेच कार वर्ग वारीतील वाहन फिटनेसची मुदत संपल्यानंतर उशिरा नेल्यास प्रति महीना ५०० रुपये व दुचाकी प्रति महीना ३०० रुपये दंड आकारण्याची तरतूद नव्या नियमात केलेली आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जास्त महसूल
गेल्यावर्षी दर कमी असल्याने तसेच दंडाची रक्कमही कमी असल्याने वर्षभरात १५ वर्षांपेक्षा जास्त वयोमर्यादा असलेल्या ६३९ वाहनांची फिटनेस आणि रि रजिस्ट्रेशन करण्यात आले. यातून पाच लाख ६८ हजार ५०० रुपयांचा महसूल जमा झाला होता. यंदा तीनच महिन्यात केवळ ६९ वाहनांची रि रजिस्ट्रेशन करण्यात आले. यातून तीन लाख ७८ हजार रुपये महसूल मिळाला.

नव्या नियमानुसार शुल्क आकारणीने महसूल वाढला दरमहा दंडाची रक्कमही वाढली
‘फिटनेस व री-रजिस्ट्रेशन’ शुल्कवाढीमुळे तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला आहे. तसेच दरमहा दंडाची रक्कमही वाढली आहे. त्याचाही महसूल वाढला आहे. ऑनलाइन सिस्टिममध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे दंड व रि रजिस्ट्रेशनचा आकडा कळतो.
राहुल जाधव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...