आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:कळंब येथील वैद्यकीय‎ अधिकाऱ्याला मारहाण‎

धाराशिव‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब येथील उपजिल्हा‎ रुग्णालयात एकाने गोंधळ घालत‎ वैद्यकीय अधिकाऱ्यास बेदम‎ मारहाण केली. तसेच जीवे‎ मारण्याची धमकी दिली. हा प्रकार‎ शुक्रवारी (दि. ३) ४ वाजेच्या‎ दरम्यान घडला.‎ कळंब येथील उपजिल्हा‎ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.‎ चंद्रकांत बापूराव लामतुरे उपचाराचे‎ काम करत होते. त्यावेळी अनिल‎ विठ्ठल कांबळे (रा. कल्पनानगर,‎ कळंब) याने गोंधळ घालण्यास‎ सुरुवात केली.

त्याने चंद्रकांत‎ यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची‎ भाषा करुन वाद घातला. डॉ.‎ लामतुरे यांनी समजावून सांगण्याचा‎ प्रयत्न केला. तेव्हा शिवीगाळ करुन‎ डॉ. लामतुरे यांना मारहाण केली.‎ तसेच जिवे मारण्याचीही धमकी‎ दिली. यावरुन वैद्यकीय अधिकारी‎ डॉ. चंद्रकांत बापूराव लामतुरे यांच्या‎ फिर्यादीवरून कळंब पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल झाला.‎

बातम्या आणखी आहेत...