आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाराशिव तालुक्यातील घटना:अल्पवयीन मुलीवर नराधमाचा दीड वर्षाने दुसऱ्यांदा अत्याचार

धाराशिव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

५७ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय बालिकेवर दीड वर्षाने दुसऱ्यांदा पाशवी अत्याचार केल्याचा प्रकार धाराशिव तालुक्यातील एका गावात उघडकीस आला आहे. पीडित ८ वर्षीय मुलगी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता घरासमोर खेळत असताना घराशेजारील आरोपीने तिला चॉकलेट, बिस्किटचे अामिष दाखवून एका शाळेच्या मागे नेले. तेथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, दीड वर्षापूर्वी म्हणजे २५ सप्टेंबर २०२१ ला याच नराधमाने याच मुलीला भीती दाखवून घराच्या जवळच्या पडक्या घरात नेऊन अशाच प्रकारे अत्याचार केले होते. त्या वेळीही असाच गुन्हा त्याच पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होऊनही आरोपीच्या मानसिकतेत काहीच फरक पडला नाही. पुन्हा त्याने शुक्रवारी असे घृणास्पद कृत्य केले.