आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाई उद्धवराव पाटील प्रशाला येथे २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मुलनावर आधारित चमत्कारा मागील विज्ञान व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका एस. ए. नलावडे , अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा अध्यक्ष अॅड.अजय वाघाळे,अंनिस शहर अध्यक्ष सिदेश्वर बेलुरे, अंनिस जिल्हा प्रधान सचिव वामनराव पांडगळे, जेष्ठ साहित्यिक विजय गायकवाड हे होते. शाळेच्या वतीने प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी चमत्कार मागील विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण अॅड.अजय वाघाळे यांनी केले. चमत्कारा मागील विज्ञान ''या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बीन वातीचा पाणी घालून दिवा प्रज्वलीत करुन उद्घाटन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. ए. नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले. ॲ तसेच जादु टोना प्रतिबंधक अधिनियम २०१३ बदल माहिती सांगतांना म्हणाले की भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला श्रद्धा उपासनाचे स्वातंत्र्य आहे.
परंतु श्रद्धेच्या नावाखाली समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणे, करणी, भूत,भानामती, यांची भीती दाखवून आर्थिक प्राप्ती करणे, शारिरीक मानसिक व्यक्तीवर अघोरी उपचार करणे, साप, विंचू , कुत्रा चावल्यास विष उतरविण्याचा दावा करणे, गुप्तधनाच्या हव्यासापोटी नरबळी, पशुबली देणे, या व इतर अघोरी व अमानुष कृत्य करणे हे अंधश्रद्धा निर्मूलन कायदयाने गुन्हा असून सात वर्षी पर्यंत शिक्षा व आर्थिक दंड असल्याचे ते म्हणाले. जादूटोणा विरोधी कायदा हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही, उलट समाजाचे शोषण करणाऱ्या व्यक्तीला प्रतिबंध करते,असे वाघाळे म्हणाले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, एम. बी. देशमुख, पी.के. गाढवे, एच.व्ही. घेणारे , एस. एल. चौरे उपस्थित होते. यावेळी प्रास्तविक नलावडे यांनी केले.
विविध प्रयोग सादर
अॅड. अजय वाघाळे यांनी चमत्कारा मागील विज्ञान व त्यामागील अंधश्रद्धा या विषयी मुलांना प्रबोधन करताना त्यांनी चमत्कारावर आधारित विज्ञानाचे प्रयोग सादर केले त्यामध्ये साखळदंड तोडणे, पाण्यावर दिवा पेटवणे ,कलशामध्ये वेगवेगळ्या नद्यांचे पाणी काढणे,प्रश्न चिन्हावरती बॅलेंसिंग करणे, एकादिशेमध्ये दोरी वळवणे, करणी भूत, भानामती या मागील अंधश्रद्धा याविषयी प्रबोधन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.