आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुका क्रीडा मैदानाच्या विकासासाठी तीन कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केले. महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कळंब क्रिडा मैदानावर राज्य स्तर शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी व्यासपीठावर आमदार कैलास घाडगे पाटील, तहसीलदार मनिषा मेने, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी सारीका काळे, नगर पालिका मुख्याधिकारी शैला डाके, नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे, उस्मानाबाद जिल्हा आट्या पाट्या संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सोमवंशी, लक्ष्मण मोहिते, घूले, तालुका क्रीडा अधिकारी कैलास लटके, क्रिडा अधिकारी नदीम शेख, सोलापूर जिल्हा आट्या पाट्या संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब कापसे, युवासेना शिवसेना (ठाकरे गट) युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे शहरप्रमुख प्रदिप मेटे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार कैलास घाडगे पाटील म्हणाले की, कळंब तालुक्याने आट्या पाट्या खेळाला देशपातळीवर खेळाडू दिले आहेत, सलग चार वर्ष कळंब तालुक्यात राज्यस्तरीय शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा घेण्याचा बहुमान मिळवला आहे. आणि प्रत्येक वर्षी चांगल्या पद्धतीने स्पर्धा घेतल्या आहेत.
कळंब येथे क्रिडा संकुलाची दुरावस्था झाली होती. तालुका क्रीडा अधिकारी व रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीने या क्रिडा संकुलाचा कायापालट केला आहे आणि याच मैदानावर आता राज्य स्तर शालेय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा होत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. या स्पर्धांमध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केले. यावेळी सूत्रसंचलन परमेश्वर मोरे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.