आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरगा तालुक्यातील येणेगूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत आघाडीच्या सरपंचासह १४ उमेदवार विजयी झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांची गावात वाजत गाजत ट्रॅक्टर घेवून मिरवणूक काढण्यात आली.सरपंचपदाच्या लढतीत रेखा गुंजोटे यांच्या ट्रॅक्टरला १५२९ मते व प्रीती बिराजदार यांच्या बसला ११२१ मते तर देविनंदा बनसोडेंच्या गॅस टाकीला ७७४ मते पडली.
या तिरंगी लढतीत ट्रॅक्टरने बाजी मारत ४०८ मतांनी विजय मिळवला आहे तर ग्रामविकास पॅनलचे एक सदस्य संतोष कलशेट्टी हे निवडून आले असून अपक्ष दिलीप येडगे हेही विजयी झाले आहेत भाजप शिंदे गटाच्या ग्रामसमृधी पॅनलला आपले खातेही उघडता आले नाही. काँग्रेस पुरस्कृत येणेगूर विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये सरपंच रेखा गुंजोटे, सदस्य प्रवीण कागे, गुरुबाई बिराजदार, राणी सुरवसे, संदीप बिराजदार, गायत्री हिप्परगे, गौराबाई माळू विजय सोनकटाळे, आशाबानू मकानदार, जिजाबाई कांबळे, बाबासाहेब गायकवाड, लक्ष्मी पाटील, राहुल बनसोडे, ज्योती मुदकण्णा यांचा समावेश आहे.
येणेगूर विकास पॅनलच्या विजयी उमेदवारांची ट्रॅक्टर सह मिरवणूक काढण्यात आले यावेळी महिलांनी विजयी उमेदवारांची औक्षण करीत अभिनंदन केले. परमहंस महाराज मंदिराजवळ या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी पॅनल प्रमुख चेअरमन बाबासाहेब बिराजदार,श्रीहास उटगे,माजी जि प सदस्य रफिक तांबोळी,माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश मुदकण्णा उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.